पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा एन्काऊंटर करून या प्रकरणाचा तपास थांबवला जाईल असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्याला गती देण्याची गजर आहे. ससूनचे डीन, बंड गार्डन पोसी स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही अटक करा, अशी मागणीही आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ?” गुजरातच्या पोलिसांनी संभाजीनगरात ५०० कोटींचा ड्रग्जसाठा केला जप्त
ललित पाटील प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास केला जात आहे. यातच अधिक तपास करण्यासाठी ललित पाटीलला नाशिक येथील कारखान्यावर नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला पुन्हा पोलिसांनी अंधेरी कोर्टात हजर केले, यातच त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने कोर्टाने आता 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब
सुरूवातीपासून रवींद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणावरून आक्रमक राहिले आहेत. ससून रूग्णालयातील डीन आणि ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. यातच ललित पाटील प्रकरण राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून यात मोठ्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे ललित पाटीलचा एन्काऊंटर करन प्रकरणाचा तपास थांबवला जाईल. असा आरोप धंगेकरांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?