बीड : भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जमीनच्या वादातून एक महिलेने आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिंघाविरूद्ध विनयभंग आणि अॅस्ट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता भाजप आमदारावर आणि त्यांच्या पत्नीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षहित बाजूला ठेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब
लज्जास्पद असं म्हणत मध्यप्रदेश, मणिपूरमध्ये, हेच घडलं होतं. आता महाराष्ट्रात सुद्धा तेच घडत आहे. भाजपशासित राज्यात आदिवासींवर अत्याचार करणारी भाजपचीच टीम तयार होत आहे. बीडमध्ये एका आदिवासी महिलेला भाजप आमदाराच्या पत्नीने विवस्त्र करून मारहाण केली आहे. आदिवासी महिला स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्यावर नग्नावस्थेत धावत राहिली. या प्रकरणात दोषी असलेल्या भाजप आमदारावर आणि त्यांच्या पत्नीवर गृहमंत्री पक्षहित बाजूला ठेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती
जमीन बळकवण्याच्या हेतूने महिलेचा विनयभंग करत तिला विविस्त्र करण्याची आल्याची घटना वाळुंज येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४० वर्षीय महिला तिच्या पती आणि सुनेसह शेतात काम करत असतांना काहींनी शेतजमिनीत घुसखोरी करण्याची प्रयत्न केला. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे रघू कैलास पवार आणि राहूल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुनेसमोर एका महिलेला विविस्त्र केले. त्यानंतर संबंधित जीव वाचवण्यासाठी महिला पळत सुटली. हे सर्व प्रकार प्राजक्ता सुरेश धस आडोशाला राहून पाहत होत्या अन् तिला चांगला चोप द्या असे म्हणत होत्या. यातच प्राजक्ता धस यांनी २० ते २५ गुंडंही बरोबर आणल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणाबाबत महिला आयोगाने देखील दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्यात येईपर्यंत याचा पाठपुरावा करत राहणार असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तर आमदार सुरेश धस यांनी संबंधित महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
लज्जास्पद!
मध्यप्रदेश, मणिपूरमध्ये हेच घडलं होत, आता महाराष्ट्रात सुद्धा तेच. भाजपशासित राज्यात आदिवासींवर अत्याचार करणारी भाजपचीच टीम तयार होत आहे.बीडमध्ये एका आदिवासी महिलेला भाजप आमदाराच्या पत्नीने विवस्त्र करून मारहाण केली. आदिवासी महिला स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्यावर… https://t.co/3sHW6Rswdf
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?
हेही वाचा…“महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ?” गुजरातच्या पोलिसांनी संभाजीनगरात ५०० कोटींचा ड्रग्जसाठा केला जप्त