मुंबई : तुम्हाला जर कुणी विचारलं की तुमचे आदर्श कोण आहेत. तर महाराष्ट्राबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचे आदर्श महाराष्ट्रातच मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलत आहे. असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी करून टाकली. त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला आहे. त्यावरून मनसेने देखील राज्यपालांचा समाचार घेतला आहे.
“नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला
राज्यपालांनी सुधारायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता?गडकरी, पवार साहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा, त्यांनी घ्यावा पण छत्रपती शिवाजी महाराज भुतकाळ. वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा. असा खोचक टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.
इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
तर राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धीक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत. याची खंत वाटते. असं म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप, मनसे आणि राज्यपालांना टोला हाणला आहे.
Read also
- “राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
- राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
- “गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
- “सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे