नवी दिल्ली : दिल्लीत आप आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण इडीच्या अटकेत असलेले आपचे नेते सत्येंदर जैन यांना तुरूंगात व्हीआयपी सेवा देत असल्याचे व्हिडीओ भाजपने ट्विट केले आहेत. त्यावरून तिहार तुंरूगातील पोलीस निरीक्षक अजित कुमार यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.
“विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
सत्येंदर जैन यांना इडीने ऑगस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्यावर संबंधित कंपन्यांच्या 4 कोटी 81 लाख रूपयांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सीबीआयने 2017 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे इडीने या प्रकरणाचा तपास केला. आणि त्यांना अटक करण्यात आली.
“भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
सत्येंदर जैन यांना तिहार येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहेत. तरूंगात त्यांना विशेष सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप होत होता. त्यातच आता त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्यांना डोक्याला मसाज, पायाला मजास करून देण्याबरोबर पाठ चोळून देण्यासारख्या विशेष सेवा देण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावरून भाजपने त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर सातत्याने टिका करीत आहेत. मात्र भाजपने आता जैन यांचे व्हिडीओ ट्विट करत केजरीवाल यांना अडचणीत आणले आहेत. कारण गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीत देखील महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे अरविदं केजरीवाल आता काय भूमिका घेणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य आहे.
कट्टर ईमानदार पार्टी ने तिहाड़ जेल में ही अपने भ्रष्ट मंत्री सत्येंद्र जैन के लिए खोला मसाज पार्लर..
सत्येन्द्र जैन जेल में यूं करवट बदल बदल कर दिन काट रहे हैं….! pic.twitter.com/HMZvaL3VQM
— Srinivas BV (@srinivasiyc) November 19, 2022
Read also
- “आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं
- “देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
- “शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
- राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली