बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल शेगाव येथे गजानन महाराजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रांगेत उभं राहुल गजानन महाराजांचा प्रसाद देखील घेतला. त्यानंतर त्यांनी शेगाव येथे विराट सभा घेतली. आता याच वरून पुणेचे माजी महापौर मुरलिधर मोहाळ यांनी राहुल गांधींचा फोटो ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोचक टोला हाणला आहे.
“भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
शेगावमध्ये काल भारत जोडो यात्रेचं लाखो लोकांच्यासोबत राहुल गांधी यांचं आगमन झालं. त्यानंतर राहुल गांधी यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेत. हा फोटो ट्विट करत मोदी है तो मुमकीन है..! असं म्हणत मुरलिधर मोहोळ यांनी राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
त्यानंतर लगेचच प्रशांत जगताप यांनी देखील त्यावर खोचक टिप्पणी केली. परमेश्वर ज्याला बोलावतो तो नकळतपणे धावत जातो. आता याचंही श्रेय तुम्ही मोदींना देणार असाल तर परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी. असं म्हणत प्रशांत जगताप यांनी मोहोळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या फोटोवरून पुण्याचं राजकारणही तापलेलं दिसून आलं.
“राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
दरम्यान, अकोला येथे राहुल गांधींनी सावकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापलं होतं. शेगाव मधील सभेत देखील राहुल गांधी सावरकरांविषयी बोलणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या मुद्दावरून भाजपला लक्ष्य केलं. मात्र त्यांनी यावेळी सावरकरांविषयी बोलण्याचं टाळलं.
परमेश्वर ज्याला बोलावतो तो नकळतपणे धावत जातो. आता याचंही श्रेय तुम्ही मोदींना देणार असाल तर परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.
आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी https://t.co/UqEj7stoLY— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) November 19, 2022
Read also
- “देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
- “शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
- राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
- “विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”