बुलढाणा : अकोला याठिकाणी सावरकारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर राज्यात राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार आंदोलने झालीत. मनसेने आक्रमक भूमिका घेत राहुल गांधी यांच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवले. यातच शेगावच्या सभेत देखील राहुल गांधी या प्रकरणावर बोलतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र यावर राहुल गांधी यांनी बोलण्याचं टाळलं.
“संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
अकोला येथे राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टिका टिप्पणी केली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. शेगाव सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या ह्या मुद्यांवरून भाजपवर कडाडून प्रहार केला. भाजप देशात हिंसा पसरवत असून त्या हिंसेला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
“सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
सध्या देशात भाजप द्वेषाचं राजकारण करीत आहेत. लोकांनामध्ये भिती घालत आहेत. पंरतु आमची यात्रा ही प्रेमाची यात्रा आहे.. या यात्रेच्या माध्यामातून तुमच्याशी संवाद साधत आहेत. रोज मला अनेक लोकं भेटत आहेत. त्यांच्या समस्या सांगत आहेत. महाराष्ट्रातील लोक मला विचारताहेत की, आमच्या मालाला भाव का नाही.? त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मनातील भावना ओळखा, असंही ते म्हणाले.
“राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
दरम्यान, शेगाव येथे झालेल्या सभेत लाखो जणांची गर्दी उसळली होती. यावेळी काॅंग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते. राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतलं.
Read also
- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
- “विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
- “भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधींना अटक करा”; नेत्यांची धरपकड केल्याने मनसे आक्रमक
- काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मनसेच्या नेत्यांची धरपकड..! चिखलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- “राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल