नागपुर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांच्या सुरक्षितेविषयी माहिती घेत आहेत. सोबत त्या पत्रकार परिषदा देखील घेत आहेत. मात्र संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ सातत्याने भडकतांना दिसत आहेत. नागपुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देखील चित्रा वाघ ह्या पत्रकारांवर भडकल्या.
“भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
संजय राठोड यांच्याबद्दल नागपुर येथेही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही कोणताही आरोप करू शकत नाहीत. एक नाही तर शंभर प्रश्न विचारा. परंतु तुम्ही माझ्यावर कोणताही आरोप करू शकत नाहीत. माझी याप्रकरणावर अगोदरच भूमिका मांडली आहे. ती लढाई आता न्यायालयात गेली आहे. पंरतु एकदा नाहीत तर हजारदा तुम्ही त्याच त्याच विषयावर मला घेरण्यासाठी प्रश्न विचारत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात जाते. तिथे याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देते. तरी देखील तुमचं समाधान होत नाही. संजय राठोड प्रकऱण न्यायप्रविष्ठ आहे. जर प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर त्यावर जास्त काही बोलू नये. परंतु तुमच्यामुळे मला बोलावं लागतं. या प्रकरणावरून माझ्या परिवाराला घेरलं. आमच्यावर खोट्या केसेस केल्या. तरी देखील कुणी आलं नाही. परंतु मी लढत होती. त्यानंतर माझी भूमिका मी सोडली नाही. असंही त्या म्हणाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
दरम्यान, तसेच तुम्हाला एका पत्रकारांनी प्रश्न केला होता. त्यावेळी तुम्ही सुपाऱ्या घेऊन आले आहेत का ?असा सवाल केला असता त्या म्हणाल्या की, तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता. आरोप करू शकत नाहीत. त्यावेळी त्यांनी माझ्यावर आरोप केला. त्यावेळी चित्रा वाघ चुकली? असं म्हणायचं का? तुम्ही न्यायालयात आहात का? तुम्ही न्याय देवता आहेत का ? चुकली असेल तर हजार वेळा माफी मागणार. जर तुम्ही उगाचच महिला म्हणून घेरत असाल तर मी देखील चित्रा वाघ आहे. असा सज्जड दम देखील त्यांनी दिला.
Read also
- “सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- “राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
- “आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
- “अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
- “जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका