मुंबई : राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकारांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील राजकीय नेते आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टिका टिप्पणी करीत आहेत. असंच सुरू राहिलं तर महाविकास आघाडी तुटूही शकते. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
ज्या कारणावरती आम्ही एकत्र आलो, त्या कारणाच्यापुर्वी वैचारिक मतभेद दोन्ही पक्षांमध्ये होते हे स्पष्ट होतं. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. त्यामुळे शिवसेना ज्यावेळी कुठलाही विषय़ मांडते, त्यावेळी ते विषय लोकशाही आणि संविधानाच्या परिघातले नसले तर ते आम्हाला आवडतात असं नसतं. त्यामुळे हा विषय देशातील सर्वोच्च गोष्टी काय आहे, जनतेला काय वाटतं या दृष्टीने पक्षाने विचार करावा. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले त्यामध्ये कुठल्याप्रकराची ऐतिहासिक मोडतोड नाही ते सत्य आहे. त्यामुळे सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं. त्याला आता करणार काय आपण ते बदलू शकत नसतो. देश चालत असताना तो गांधींच्या विचाराने चालावा, तो सावरकरांच्या विचाराने चालूच शकत नाही. अशी काॅंग्रेसची भूमिका आहे. असंही ते म्हणाले.
“राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”
दरम्यान, भारत जोडो यात्रा देशातली हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी यावर, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. अशावेळी सावरकरांचा मुद्दा काढायची गरज नव्हती. आमचीच नव्हे तर काॅंग्रेसच्या नेत्यांचीही अडचण होत आहे. महाविकास आघाडीत अशाने फुटही पडू शकते, असं सुचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.
Read also
- “राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
- “आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”
- “अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
- “जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
- “भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन