बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही आज शेगावमध्ये येत आहेत. राहुल गांधींनी सावरकारांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्ध्या रस्त्यात पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदबोस्त तैन्यात करण्यात आला आहे.
“अशाने महाविकास आघाडीत फुटही पडू शकते”; राऊतांचं सुचक वक्तव्य
सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या सभेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते शेगावमध्ये दाखल होण्यासाठी आले असता. त्यांना चिखली येथेच पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले आहे. यामध्ये मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांना ताब्यात घेतलं आहे.
“जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टिका
पोलिसांकडे कोणतेही आदेश नाहीत. लोकशाहीच्या मार्गाने निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमचे विविध ठिकाणांहून कार्यकर्ते आलेले आहेत. सभेच्या ठिकाणी ते पोहचतील. पोलीस अन्यायकारक पद्धतीने आम्हाला इथे थांबवत आहेत. आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
Read also
- “राहुल गांधींची भारत जोडो नाहीतर मोदी विरोधी जोडो यात्रा”; फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल
- “संजय राठोड विषय निघताच चित्रा वाघ भडकल्या”; म्हणाल्या, “तर मी ही चित्रा वाघ आहे, लक्षात ठेवा”
- “सावरकरांच्या नाही तर देश गांधींच्याच विचाराने पुढे चालवा”; काॅंग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
- “राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देऊ..!” धमकीच्या पत्राने खळबळ
- “आम्हाला जर काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ”