मुंबई : येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारांच्या तोफा आता भडकल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला आप पक्षाचं मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी आपने आपल्या प्रचाराचा दणका उडवून दिला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्याची मोठी फळी गुजरातमध्ये प्रचारासाठी दाखल झाली आहे.
“शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले. जे.पी. नड्डा यांच्यासह सुमारे 15 राष्ट्रीय नेत्यांनी 40 हून अधिक सभांना संबोधित केले. या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, आणि अनुराग ठाकुर, उत्तर प्रदेशछे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहन हे निवडणुक रिंगणात उतरले आहेत.
राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
याशिवाय, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या आणि लडाखचे भाजप खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनीही गुजरातमध्ये भाजपचा प्रचार केला. विशेष म्हणजे, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याला कार्पेट बॉम्बिंग म्हटले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल गुजरातमध्ये जाऊन निवडणुकीचा प्रचार केला आहे.
“आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची हवा सध्या गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यांनी आपल्या संपुर्ण उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यासाठी मोठा प्रचार करीत आहेत. गुजरात विधानसभेची मुदत 18 फेब्रुवारी 2023 मध्ये संपणार आहे. 182 सदस्य़ संख्या असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेत 111 आमदार भाजपचे आहेत. तर त्याच्या खालोखाल 62 आमदार काॅंग्रेस पक्षाचे आहेत. मागील 25 वर्षापासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे.
Read also
- “सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
- “नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला
- इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
- “आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं
- “देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत