औरंगाबाद : सध्या राज्यात द्वेषमुलक राजकारण पसरवलं जात आहे. या द्वेषमूलक राजकारणामध्ये जाती आणि धर्म एकमेकांना हरवण्याच्या नादात माणूसकी हरली आहे. हाच महत्त्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. रज्यात मागील काही दिवसापासून अनेक वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यावर त्या बोलत होत्या.
राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अकोला येथे सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं . त्यानंतर राज्यात भाजप अन् मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. त्यातच मागील काही दिवसापासून राज्यात शिंदे सरकार विरोधकांनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील होत आहेत. त्यावरून देखील सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.
“आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा ;” राष्ट्रवादी तयारीला लागली
स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे नाव सोयीनुसार वापरायचे आणि राजकारण करायचे हा भाजपचा खेळ आहे. अनेक मुद्दे आहेत. जेव्हा हे कुठेच दिसत नाहीत. लोकांच्या जगण्या-मरण्यासंबंधीचे प्रश्न असतात. तेव्हा हे येत नाहीत. पंरतु जेव्हा जेव्हा यांना वाटते की, यांचे अपयश उघड उघड आहे. तेव्हा ते वादंग करण्यासाठी झटकन पुढे येतात. असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.
“विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा, भारत जोडो यात्रा अखंड सुरू राहणार”
दरम्यान, राज्यात सावरकर आणि नेहरू वाद पुन्हा एका चर्चेत आला आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलने केलीत. त्याला मनसेने देखील साथ दिलीत. तर राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी देखील यावरून एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली. त्यामुळे राज्यातील राजकारणाला आता नवं वळण मिळालं आहे.
Read also
- “नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला
- इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
- “आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं
- “देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
- “शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा