औरंगाबाद : राज्यात स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबदचा वाद संपता न संपता अजून पुन्हा एक वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.
“देशासाठी ज्यांनी त्याग केलाय, त्यांच्याविषयी कुणीही चिखलफेक करू नये”; संजय राऊत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापाठीकडून डी.लीट ही मानाची पदवी प्राधान करण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी नितीन गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली आहे. त्यामुळे आता सगळ्या स्तरातून त्यांच्यावर टिका केली जात आहे.
“शरद साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, पुराव्यासकट बाहेर काढणार”; दानवेंचा संदीपान भूमरेंना इशारा
तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रात तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ.नितीन गडकरी यांच्यापर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील. असं भगतसिहं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी..! मात्र वीर सावरकरांबाबत बोलण्याचं टाळलं
दरम्यान, पुढे त्यांनी असं म्हटलं की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? तेव्हा आम्ही सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे. ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिर किंवा आदर्श कोण ? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. तुम्हाला महाराष्ट्रातच मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. असंही ते म्हणाले.
Read also
- “गुजरातच्या धर्तीवर उतरली भाजपच्या मुख्यमंत्र्यांची फौज”; निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला
- “सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकरण करण्याचा भाजपचा डाव”; सुषमा अंधारे
- “नारायण राणेंचं विधान म्हणजे चिंटूचे जोक”; राणेंचा तो दावा गोऱ्हेंनी फेटाळला
- इडीच्या अटकेत असलेल्या आपच्या नेत्याला VIP सेवा..! व्हिडीओ व्हायरल, भाजपचा निशाणा
- “आम्ही म्हणू श्री हरी, तुम्ही करा मोदी मोदी”; अन् भाजप नेत्याला राष्ट्रवादीच्या नेत्यानं डिवचलं