पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता मनसेकडून यासंदर्भात माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. पुण्यात राज ठाकरे यांची सभा 22 मे रविवार रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे.
ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
मागील काही यांनी सभांचा धडका लावला आहे. मुंबईतील दोन सभा आणि औरंगाबादेतील एका सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज ठाकरे यांचे टार्गेट राहिले. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.
“OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वसंत मोरेंचे नाराजी नाट्य सुरु आहे. याबाबत राज ठाकरेंना भेटायचे आहे. त्यांच्याशी भेट झाली की नाराजी दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वेळी राज ठाकरे जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. या वेळेस मला वेळ दिला होता, मात्र अचानक तब्येत बिघडल्यानं राजसाहेब मुंबईला गेले. पुढच्या वेळेस नक्की वेळ देतील. मात्र, पुण्यातील सभा आमच्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. मी माझ्या पद्धतीने तयारी करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे.
Read also:
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा