बीड : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने आता आपले लक्ष ग्रामीण भागाकडे केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मनसेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. अशातच बीड जिल्हा परिषदेत मनसेची विजयी सुरुवात झाले आहे.
पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील नांदूरघाट जिल्हा परिषद गटात मनसेने विजयी सुरवात केली आहे. केज तालुक्यातील शिरूरघाटचे मनसेचे शाखा अध्यक्ष विक्रम बाप्पा सांगळे यांची शिरूरघाट ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात नेत्यानी पक्षाने उमेदवार दिला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे मनसेने आता विजयाची सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान, सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अनेक जिल्हयात जिल्हापरिषद निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता यातच माणसे ने आपल्या विजयाची सुरुवात केली आहे.
Read Also :
- विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?
- “मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!
- “त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं
- कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
- विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त; महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलणार राजकीय गणिते