पुणे : गोव्यातून लपूनछपून दारूच्या बाटल्या आणल्या तर संबंधितांवर महाराष्ट्रात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गोव्यातून दारूच्या बाटल्या आणणं म्हणजे कारवाईल सामारं जावं लागणार आहे. यावरून राज्यात राजकीय नेत्यांनी या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. दारू तस्करी करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो पोलीस प्रशासनाला पाठवण्याच्या सुचना देसाई यांनी दिली आहे. यावर गोव्यातून बाटली घेऊन येणाऱ्याला मोक्का, अन् गोव्यावरून आमदार घेऊन येणाऱ्याला खोक्का अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे युवासेनेचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे.
“अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले
एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेविरोधात बंड पुकारला होता. त्यावेळी बंडखोर आमदारांसह सुरत गाठलं होतं. त्यानंतर गुवाहटी असा प्रवास करत गोव्यातून ते महाराष्ट्रात आले होते. अन् देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी युतीत सरकार स्थापन केलं. त्यानंतर त्यांच्यावर 50 खोक्के घेतल्याचा आरोप करण्यात आले. तसेच त्यांच्यावर राजकीय पक्षातील नेते 50 खोक्के एकमद ओक्के म्हणून सातत्याने डिवचतात असतात.
Read also
- आई भवानी…! आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर..; देवेंद्र फडणवीस
- “आमचच नाणं खणखणीत, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलतोय”; सुप्रिया सुळे
- “पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील
- सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
- “दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”