मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनायल कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुरक्षेची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
आज दुपारी २ वाजता या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर देशमुख यांनी केंद्रीय एजन्सीनं जारी केलेल्या समन्सला आव्हान दिलं असून त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. देशमुख यांच्यावर मुंबईतील अनेक हॉटेल बार मालकांकडून वसुली केल्याचा आरोप आहे.
हे पण वाचा: “पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांनी विचारला आदित्य ठाकरेंना जाब
यासोबतच निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेनं देशमुखांच्या सूचनेनुसार ४.७ कोटी रुपये वसूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वसूल केलेले पैसे नागपुरातील त्यांच्या मुलाच्या शिक्षण ट्रस्टजवळ पोहोचले, असं म्हटलं जात आहे. अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चा तपास वेगानं बुधवारी अनिल देशमुखां विरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे.
हे पण वाचा: “केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा
अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय मार्फत करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात १२ ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं.
Read Also :
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
- आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
- ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात