परळी: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल गुरुवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परळी शहरातून मदत फेरी काढली आहे. यावेळी त्यांना जे लोकांनी जे आपल्यावर प्रेम दाखवले ते चित्र बघायला मिळाले ते भारावून टाकणारे क्षण आणि ऊर्जा देणारे झण होते, असे म्हणत आपल्या फेसबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे पण वाचा: “मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
यावेळी यात साधारण ५० हजार रुपयांची निधी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. आपण पूरग्रस्त भागात जाणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मदत फेरीत सहभागी झाले आहेत. मुंडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हार, बुके यावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद अनेकांना प्रतिसाद दिले. त्यातून महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पूरग्रस्त गावकऱ्यांना मदत केल्याचे पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
शिवसेना प्रवेशासाठी आग्रह
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले असले तरी पंकजा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एक तर उद्धव ठाकरे हे पंकजा यांना बहीण मानतात. त्यांनी डाॅ. प्रीतम यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. शिवसेना पंकजा यांना मंत्रिपद देईल, असा विश्वासही त्यांना वाटतो. काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी समाज माध्यमांवर मोहीमही सुरू केली. समाजाचा दबाव वाढला तर पंकजा पक्षत्याग करतील, अशी आशा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा: “नुकसान मोठं मात्र मिळणारी मदत तोकडी, त्यामुळे बहाणेबाजी बंद करून जबाबदारी घ्या!”
पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
पंकजा यांनाही खडसे यांच्यासारखेच राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी तुलना प्रकर्षाने उत्तर महाराष्ट्रात केली जाते आहे. खडसे यांनी ज्याप्रमाणे भाजपचा त्याग करून नवा मार्ग पत्करला तसाच पंकजा यांनीही पत्करावा असे या पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने वाटते आहे. त्यांनी पक्षांतराविषयी पंकजांकडे विषय काढला तेव्हा त्यांनी नकार दिल्यामुळे हे कार्यकर्ते व पदाधिकारी काहीसे नाराज झाले आहेत.
Read Also :
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
- पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा
- ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु