मुंबई : खासदार संजय राऊत सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टिका करतांना दिसत आहेत. एकनाथ शिंदे गटाला त्यांनी याआधी मिंधे गट, गद्दार सेना अशा वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. यातच आता संजय राऊतांनी शिंदे गटाला जत्रेतील तंबू सेना अशी उपमा दिली आहे. यावर आता शिंदे गटातील नेत्यांकडून राऊतांना काय प्रत्युत्तर देण्यात येईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप
राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे , दुसऱ्या गटातील शिवसेना ही जत्रेतील शिवसेनेसारखी असल्याची टिका राऊतांनी केली आहे. आता मिंधे गट खोटी शिवसेनेचे पोस्टर लावून फोटो काढत आहेत. त्यांना काढू द्या. यांची जत्रेतील तंबूसारखी खोटी शिवसेना आहे. ज्यावेळी जत्रा संपली की तंबू काढून टाकतात. तशी त्यांची शिवसेना आम्ही काढून टाकणार असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
दरम्यान, यातच आता शिवसेनेचा १८ जुन रोजी वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा टिझर देखील शिंदे गटाकडून रिलीज करण्यात आला आहे. यातच आता ठाकरे गटाकडून देखील वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आता जोरदार टिका टिप्पणी दोन्ही गटाच्या नेत्यांकडून होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश