नागपुर : काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केल्यानंतर काॅंग्रेसचे निंबलित नेते आशिष देशमुख उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. यातच भाजपमध्ये माझा पुर्नप्रवेश होत असल्याची प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं
आशिष देशमुखांना निलंबित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतरच देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यातच आता भाजपमध्ये प्रवेश करण्याअगोदर त्यांनी नितीन गडकरी यांच्या भेट घेतली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट असल्याचं मानलं जात आहे.
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
दरम्यान, लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीपुर्वी नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत कस्तूर जन पारकर याठिकाणी माझा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यानंतर ऑक्टोंबरच्या निवडणुकीत मला सावनेर विधानसभेची निवडणुक लढविण्याची संधी देण्यात आली होती. या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपमध्ये माझा पुर्नप्रवेश होत असल्याचा मला आनंद आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
सावनेर आणि काटोल ह्या दोन मतदारसंघावर भाजपचे लक्ष्य असून ही दोन्हीही मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. सावनेर मतदारसंघात काॅंग्रेसचे सुनील केदार तर काटोल मतदार संघात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आमदार आहेत. आगामी निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघापैकी भाजप आशिष देशमुखांना आपली उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश
हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर