मुंबई : देशात एव्हाना राज्यात समान नागरी कायद्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहेत. भाजपशासित काही राज्यात समान नागरी कायदा मंजुर करण्यात आला आहे. परंतु ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्याठिकाणी अद्यापही समान नागरी कायदा मंजुर करण्यात आलेला नाही. आताच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
समान नागरी कायद्याबाबत प्रश्न विचारले असता. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला आता दोनच मुलं आहेत. ती मुलं काॅंलेजला गेल्यावर मला अजून वाटतं की मला दोन मुलं असती तर किती मजा आली असती. घर पण किती मोठं आहे. ही एक भावनिक भावना आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अधिसूचना काढला आणि लगेच मोठ्या ताईंनी चार चार मुलांचे समर्थन करायला सुरूवात केली. सुप्रिया सुळे यांनी लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला काय साध्य करायचं? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. घरात जास्त मुलं असणं ही फक्त मजा आणि आनंदाची बाब असू शकत नाही. तर त्यांचे योग्य पालन होत त्यांना या देशाचे सजग व जबाबदार नागरिक बनवणे हे ही आपलं कर्तव्य. चार चार अपत्यांचं समर्थन कशासाठी? एक राष्ट्र एक कायदा म्हणून देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रगतीसाठी हा कायदा गरजेचा असल्याचं विसरू नये. असंही त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अधिसूचना काढली
आणि
लगेच “मोठ्ठ्या ताई” नीं ४/४ मुलांचे समर्थन करायला सुरूवात केली @supriya_suleलोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय…??
घरात जास्त मुलं असण ही फक्त मजा आणि आनंदाची बाब असू… pic.twitter.com/lOiUe4jzzL
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी