नवी दिल्ली : कर्नाटकात सत्ता बदल झाल्यानंतर आता भाजप सरकारने घेतलेले निर्णय काॅंग्रेसने रद्द करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री सिद्धारामयाय यांनी लोकांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास सुरूवात केली आहे. यातच कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा देखील बदलला असून वीर सावरकर आणि केशव हेगडेवार यांच्यावरील धडाही अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राज्यातील भाजपच्या नेत्यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
लोकांच्या मनातून तुम्ही सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वतंत्र संग्राम सेनानी हा लोकांच्या मनातून काढू शकत नाही. परंतु काॅंग्रेसचा सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपक्षित नाही, केवळ अल्पसंख्यांकांचा लांगुनचालन करण्याकरता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटकचे सरकार घेत आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार. तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला केला आहे .
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकारांचा ज्या पद्धतीने अपमान केला आणि तो अपमान तर केलात पण काॅंग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारला आदेश देऊन सावरकरांच्याबद्दलचे इतिहासातील धडे वगळून टाकले. एवढचं केलं नाही तर हिंदूनंना मुस्लिम करणे, हिंदूंना ख्रिश्चन करण्याचे धर्मांतर होतं. त्या धर्मांतरला विरोधी कायदा होता. तो कायदा रद्द केला आहे. कर्नटाकमध्ये काॅंग्रेसचे एक मत पंजाला ज्याला एकमत किती चुकीच्या पद्धतीने झालं हे कर्नाटक उदाहरण आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून आपली याविषयीची भूमिका सांगावी, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं