पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे मागच्या निवडणुकीत ज्या उमेदवारींनी विजयी पतका फडकवली होती. त्याच उमेदवारांना याही वर्षी उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा निवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
श्रीरंग बारणे म्हणाले की, मला मावळच्या जनतेने ज्यावेळेस निवडून दिले, त्या दिवसापासून माझी तयारी मी जनतेमध्ये जाऊन काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणारा झाली. आता माझ्यासमोर पुढच्या निवडणुकीत कोण उभं राहतं. याबाबतीत मला काही घेणंदेणं नाही. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी सज्ज असल्याचं बारणेंनी सांगितले.
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
दरम्यान, भाजपने ४८ लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असून त्यांनी याठिकाणी देखील सुरू आहे. या प्रश्नावर ते म्हणालेकी, भाजप आणि शिवसेनेची युती अकरा महिन्यापुर्वी झाली आहे. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस राज्यांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे नेते उमेदवारी कुणाला द्यायची हे ठरवतील. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघातून माझ्याबाबतीत भाजप आणि शिवसेना यांनी एकमत झाले. असंही ते म्हणाले. यातच मागच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव केला होता. त्यामुळे यानिवडणुकीत राष्ट्रवादी कुणाल उमेदवारी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार