मुंबई : खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना धमकी देण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मयुर शिंदेला अटक केली आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. परंतु या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागलं आहे. संजय राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी दोघा भावांनी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस सुत्रांनी ही माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. यावरून संजय राऊतांवर विरोधकांनी टिका केली आहे. तर या प्रकरणात आता राष्ट्रवादीचाही कनेक्शन समोर आला आहे.
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी हा बनाव रचल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या प्रकरणात आता मयुर शिंदे याचे राष्ट्रवादीचे कनेक्शनही समोर आले आहे. मयुर शिंदे याच्या फेसबुक अकाऊंटवरून तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे दिसते आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत मयुर शिंदे याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना हा पक्षप्रवेश झाला होता. राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतहीर मयुर शिंदे हा सुनील राऊत यांच्यासोबतच असायचा. मयुर शिंदे हा आगामी मनपा निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्याने राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून तो विविध कार्यक्रम आयोजित करत होता. अशीही माहिती आता समोर आली आहे.
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
मयुर शिंदे हा संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेंने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेेन स्वत:च फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सुत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
दरम्यान, संजय राऊतांच्या या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना एक धमकी आली. ही धमकी ठार करण्याची होती. सुनील राऊत यांनी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती. मी तेव्हाच बोललो होतो की, मच्छराला मारण्यासाठी धमकीची काहीच गरज नाही. मात्र संजय राऊत हा ४२० असल्याने सगळ्याच बाबतीत खोटारडा आणि भंपक माणुस आहे. धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक केली आहे. हा मयुर शिंदे कोण? सुनील राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता संजय राऊतांवर ४२९ ची तक्रार दाखल झाली पाहिजे. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी