मुंबई : खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना धमकी देण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मयुर शिंदेला अटक केली आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. परंतु या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागलं आहे. संजय राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी दोघा भावांनी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस सुत्रांनी ही माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. यावरून संजय राऊतांवर विरोधकांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”
मयुर शिंदे हा संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेंने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेेन स्वत:च फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सुत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा…शिंदे-फडणवीस वाद पालघरला पोहचला, एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार
संजय राऊतांच्या या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना एक धमकी आली. ही धमकी ठार करण्याची होती. सुनील राऊत यांनी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती. मी तेव्हाच बोललो होतो की, मच्छराला मारण्यासाठी धमकीची काहीच गरज नाही. मात्र संजय राऊत हा ४२० असल्याने सगळ्याच बाबतीत खोटारडा आणि भंपक माणुस आहे. धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक केली आहे. हा मयुर शिंदे कोण? सुनील राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता संजय राऊतांवर ४२९ ची तक्रार दाखल झाली पाहिजे. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सुवर्णा करंजेंनी संजय राऊतांच्या भोंग्याला खरी जागा दाखवली”, नरेश म्हस्केंचा राऊतांवर हल्लाबोल
दरम्यान, व्वाह रे नौटंकीबाज ! जीवे ठार मारण्याचा फोन आल्याचं मोठ्ठं भांडवल सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलं… आणि धमकी देणारा कोण निघाला तर त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता. याचा अर्थ काय? आपल्याच कार्यकर्त्याला धमकी द्यायला सांगून केविलवाणी प्रसिद्ध मिळवायची आणि सरकारला बदनाम करण्याचा रडीचा डाव खेळायचा…! असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
व्वाह रे नौटंकीबाज ! @rautsanjay61
जीवे ठार मारण्याचा फोन आल्याचं मोठ्ठं भांडवल सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलं… आणि धमकी देणारा कोण निघाला तर त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता.
याचा अर्थ काय?
आपल्याच कार्यकर्त्याला धमकी द्यायला सांगून केविलवाणी प्रसिद्ध मिळवायची आणि सरकारला बदनाम…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”