मुंबई : खासदार संजय राऊत यांना धमकी प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. आमदार सुनील राऊत यांनी संजय राऊत यांना सुरक्षा वाढवावी म्हणून बनाव केल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्याआधी याप्रकरणात मयूर शिंदे याच्यासह चार जणांना अटक केली आहे. तर संजय राऊतांवरच ४२० कलम लावून अटक करावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
मयुर शिंदे हा संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेंने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेेन स्वत:च फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सुत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
दरम्यान, नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमधून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यात संजय राऊतांचा फोटो लावून Wanted असं म्हटलं आहे. तर रोज सकाळी भुंकणारा झाकणझुल्या, आज सकाळपासून गायब झाला आहे. हा भामटा कुठे दिसला तर जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
.@rautsanjay61 pic.twitter.com/G675vP0kA8
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले