मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये मोठ्या खडाजंगी बघायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
विचारधारेने नाही तर सत्तेचा जो हिस्सा आहे. ती सत्ता उपभोगण्याकरीता ते राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार एकमेकांना पटत नाहीत. राष्ट्रवादीला काॅंग्रेसची विचारधारा पटली असती तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी का स्थापन केली असती. ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनला आहे. नाहीतर शरद पवार यांनी काॅंग्रेस का सोडली ? हे स्पष्ट करावं. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच दोन्ही पक्षांचा विचार शिवसेना पक्षांपेक्षा वेगळा असून उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष त्यांच्याकडे गहाण ठेवला आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, भाजप हा पक्ष आता देशात एव्हाना राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज राज्यातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. त्यामुळे आम्ही सर्व्हेच्या भरोशावर जात नाही. आमची मोठी टिम असून राज्यात चांगलं काम करीत आहे. त्यामुळे आगामी काळात आमच सरकार पुन्हा महाराष्ट्रात येील. केंद्रातही आम्ही जिंकू असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्या विचारसरणीला दूर सारून बनलेला आहे-
प्रदेशाध्यक्ष @cbawankuleजी pic.twitter.com/TFzlEZzyfO— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे