मुंबई : शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून राज्यात भाजप आणि शिंदे गटात एकच वाद निर्माण झाला. यातच पालघर येथील “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या गाडीतून प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. यावरून अजित पवारांनी त्या घटनेकडे लक्ष न देण्याचं सांगितलं. त्यावर आता शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी
अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते असून त्यांनी अशीही विधान करू नये. हे लोक संजय राऊत सारखे रोज बोलत असतात. त्यांचं बोलण्याचं आम्हाला काही वाटत नाही. कारण त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बोलताना जनता त्यांना सिरीयसली घेत असते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा अजित पवार आमच्याबरोबर आघाडीवर असते याची मला खात्री आहे. आणि त्याच्यावर आम्ही अपेक्षा जशी आहे की अजित पवार यांनी सुद्धा सरकारमध्ये यावं. ते एफिशियंट मिनिस्टर आहेत. ते आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. अजित पवारांच्या संदर्भात राजकारण काय घडतं आहे. हे महाराष्ट्राने पाहिले असल्याच मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. मला काहीही वाटत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माहितीये की एकमेकांसोबत राहिल्याशिवाय दोघांची पदं राहणार नाहीत. १५५ आमदार जोपर्यंत त्यांच्यासोबत आहेत. तोपर्यंत त्यांचं सरकार चालणार आहे. त्यामुळे ते कशाला एकमेकांमध्ये अंतर पाडून कशाला घालवतील? या सगळ्या चर्चा मीडियामध्येच आहेत. असंही अजित पवारांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?