पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या चांगलीच चुरस दिसत आहे. राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचे संकेत स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले, तर विरोधी भाजपकडून देखील मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा प्रमुख म्हणून आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी आता मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भोसरी मतदारसंघात महेश लांडगे यांच्या नावाचे वलय आणि संघटात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघाची जागा भाजपला मिळवायची असेल तर महेश लांडगे भाजपला मोठा पर्याय ठरण्याची शक्यता आहे. यातच शिंदेंच्या फुटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देणं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला महागात पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
आता “पक्षाने संधी दिल्यास आपण शंभर टक्के ताकदीने लढू” असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले “शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आल्यास तसेच पक्षाकडून उमेदवारासाठी एक सर्वे केला जातो, त्या सर्व्हेमध्ये माझे नाव आल्यास भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून शिरूरमध्ये संपूर्ण ताकदीने लढणार” असं महेश लांडगे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
दरम्यान, आगामी काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर लोकसभेच्या आधी महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या तर भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. याचसोबत भाजपच्या ताब्यात असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यास महेश लांडगे यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. त्यामुळे महेश लांडगे यांना पुणे जिल्हयात पुढं करणं फायद्याचं ठरू शकते,अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी