मुंबई : खासदार संजय राऊत धमकी प्रकरणाला आता वेगळं वळण लागले आहेत. संजय राऊतांना धमकी देणाऱ्या पैकी मयुर शिंदे व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मयुर शिंदे याचे राष्ट्रवादीसोबतच संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता संजय राऊतांना सुरक्षा व्यवस्था पुरवावी, यासाठी राऊतांकडूनच हा बनाव केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आता संजय राऊत बंधूवर मोक्का कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
मयुर शिंदे याच्यासोबत संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्याबरोबरचे फोटो समाज माध्यमांवर झळकळे आहेत. त्यानंतर हा बनाव उघडकीस आला आणि हा यांनीच रचलेले बनाव होता की काय अशी शंका पोलिसांना यायाला लागली. मयुर शिंदेंचे इतर राजकीय नेत्यांसोबतही फोटो आहेत. प्रत्येक वेळेला आपण सापडलो, पकडलो गेलो की हे भाजपचा कारस्थान आहे, हे शिंदेंच कारस्थान आहेस असं म्हणून त्याची सुटका होणार नाही. या सगळ्या गॅंगस्टार लोकांना किंवा महाविकास आघाडीचे सरकार होतं. अडीच वर्ष त्याला संरक्षण देण्याचं काम राऊत बंधूंनी केले. त्यामुळे आमची महाराष्ट्र राज्य सरकारकडे मागणी आहे की या दोन्ही राऊत बंधूचा सखोल तपास केलून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करावी. असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”
दरम्यान, सगळं प्रकरण ऑर्गनाईज क्राईच्या आणि त्याच्यामधले हे दोन लोक आहेत. त्यांना खुलेआम सोडलं तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने राजकारणाला गुन्हेगारीकरण करण्याच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा लोकांना सरंक्षण देणारा राजकारणामुळे बाकीचे लोक बदनाम होतात. त्यामुळे या लोकांचा ताप लावला पाहिजे. आता आमचे अभिजीत पानसे शिवसेनेचा मनसे झाले पण संजय राऊत यांचा बाळासाहेबांचा चित्रपट जो बाळासाहेबांवर काढला त्याचे दिग्दर्शन केलं ना. संबंध काही माणसांचे खराब बोत नाही. आणि भाजपमध्ये प्रवेश केला तरी तुमचे संबंध तेच होते. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर