नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने वीर सावरकर आणि केशव हेगडेवार यांच्यावरील धडा आपल्या अभ्यासक्रमातून वगळ्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.भाजपच्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून आपली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान असून उद्धव ठाकरे यांनी याबाबत अनेक वेळा आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. सावरकर हे सर्वांसाठीच आदर्श आणि खरंतर कोणाच्या शाळेच्या अभ्यासातून धडा काढून टाकल्यामुळे कोणी लहान होत नाही. परंतु हे करण्यामागचं कारण काय आणि तुम्ही नवीन पिढीला काय उपदेश देऊ इच्छिता. त्यामुळे हा निर्णया आम्ही निषेध व्यक्त करतो. असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
लोकांच्या मनातून तुम्ही सावरकर, हेगडेवार काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वतंत्र संग्राम सेनानी हा लोकांच्या मनातून काढू शकत नाही. परंतु काॅंग्रेसचा सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपक्षित नाही, केवळ अल्पसंख्यांकांचा लांगुनचालन करण्याकरता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटकचे सरकार घेत आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार. तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला केला आहे .
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
दरम्यान, सावरकर आणि हेगडेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कर्नाटक सरकारच्या तुघलघी निर्णयाचा आम्ही निषेध करोत. अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालाही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही. महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी उबाठा आता काय वगळणार, काॅंग्रेस की सावकर काॅंग्रेसच्या असल्या ६० वर्षाच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय. तर काॅंग्रेसला साथ देणाऱ्या उबाठा ला आमदारांनी शिवसेनेतूनच वगळेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार
यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो!अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा