मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आता अनेक दिवस उलटले आहेत. परंतु अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार पुर्ण झालेला नाही. यातच एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौऱ्यावर जात आहे. यातच आज दुपारी ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
दिल्लीच्या वारीमधून काही साध्य होत नाही. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मागच्या वेळी जी काही तंबी दिलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुमचे जे वाचाळवीर मंत्री आहेत, त्यांना आता डच्चू दिल्याशिवाय आम्ही मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकणार नाही. कदाचित सुधारीत जाहिरात जी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये होती. त्यातले जे शिंदे गटाचेचे तिथे मंत्री होते, त्यांना डावलण्यात येऊ नये याची विनवणी करायाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले असावेत अंस वाटतं. यातच मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर महाराष्ट्रात फक्त मारामाऱ्याच पाहायला भेटतील असा खोचक टोलाही अमोल मिटकरी यांनी शिंदेंना लगावला.
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
दरम्यान, रक्त पिणारा कोण आहे? हे एकदा जनतेला कळायला हवं. सिल्लोड महोत्सव मधील प्लॅटिनम तिकीट त्याच्यानंतर सिल्वर करून जे काही त्याठिकाणी झालं. त्यानंतर अॅग्रोटेकमधून वसुली केली. टीईटी घोटाळा असे अनेक आरोपात अब्दुल सत्तार यांचं नाव समोर आलं आहे. जर आरोप खोटे असतील तर ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. परंतु जी धाड पडली. ती जर खोटी असती तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना झापलं नसतं. अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे. कदाचित अब्दुल सत्ता या व्यक्तीसाठी बोलावलं असेल, कारण ही व्यक्ती कायम वादाच्या भोवऱ्या आहे. राज्यातील घटनांमुळे भाजपची प्रतिमा डॅमेज झाली असं देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणं असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. असाही टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश
हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं