मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शुक्रवारी कळव्यात भ्डाय हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांच्यावर काही महिलांनी शाईफेक करत मारहाणही केली आहे. हा प्रकार शिंदे गटातील नेत्यांची केल्याचा ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येत आहे. आता या प्रकरणात शिंदे गटाची काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच या प्रकरणाबाबत अयोध्या पौळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल
कळवा येथील मनिषा नगरातील भीम नगर येथे अहिल्यादेवी होळकर जंयती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम ठाकरे गटाचा असल्याचं सांगून शिंदे गटातील नेत्यांनी अयोध्या पौळ यांना ट्रॅप करून बोलवण्यात आलं. या कार्यक्रमात महापुरूषांना अभिवादन करत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी हार का घातला? यावरून काही महिला स्टेजवर आल्या अन् अयोध्या पौळ यांच्या तोंडाला शाई लावली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद सोडवला. परंतु या कार्यक्रमातून जात असतांना एका महिलेने अयोध्या पौळ यांना मारहाण केली. असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
मी अन् माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन् माझ्या देशाचे संविधान कोणावरही हाच उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते. असलेले हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन् मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते उपनेते आमदार अन् लाखो शिवसैनिक माझ्यासोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली. घडलेला सर्व प्रकार लवकरच सांगेन असं अयोध्या पौळ यांनी म्हटले आहे.
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन… pic.twitter.com/YKMQWbiFAr
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक