नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झालेले आहे. याठिकाणी आता लवकरच पोटनिवणूक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आता या मतदारसंघात ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि ठिकठिकाणी छुप्या बैठका देखील सर्व पक्षांकडून सुरु झालेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. आता काँग्रेस आपला गड राखणार की पंढरपूर-मंगळवेढ्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष इथं धक्का देणार याकडे सर्वांच्याच नजरा आता लागल्या आहेत.
हे पण वाचा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
हे पण वाचा, मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात सर्व विषयांना न्याय देण्याची रणनिती भारतीय जनता पक्षातर्फे ठरवली गेली आहे. सर्व विषयांवर संघटनेचे कार्यक्रम राज्यभर काय काय करावेत याबाबत भारतीय जनता पक्षातर्फे लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातच नांदेडमध्ये पोटनिवडणूक येऊ घातलेली आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या पूर्ण ताकदीने या पोटनिवडणुकीत उतरणार आहे. भारतीय जनता पक्ष पंढरपूर पॅटर्न या भागात राबवणार असून निश्चितच विजयी होईल अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
हे पण वाचा, काँग्रेसने अशोक चव्हाणांकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
हे पण वाचा, नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांची घरवापसी करावी लागेल – अशोक चव्हाण
दोन दिवसाच्या अधिवेशनात आरक्षण आणि शेतकऱ्यांचा मुद्दा अत्यंत प्रखरपणे मांडला जाणार आहे. अनेक मुद्यांवर सरकारला सडेतोड प्रश्न विचारण्याची देखील तयारी झालेली आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार का असे विचारले असता पहिले निवडणूक त्यांना योग्यरीत्या जाहीर तर करू द्या असे शेलार म्हणाले. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करायची या महाविकास आघाडी सरकारमध्ये धमक नाही. आमचे उघड आव्हान आहे की महाविकास आघाडी सरकारने हा कार्यक्रम घोषित करावा असे देखील शेलार म्हटले आहेत.
हे पण वाचा,
पंढरपुरात भाजपने मारली बाजी, समाधान आवताडे यांचा विजय..!