मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला धक्का दिला, तसाच धक्का आता विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप देणार आहे. कारण याही निवडणुकीत शिवसेनेचे 50 टक्के आमदार हे भाजपला मतदान करणार असून भाजपचा पाचवा उमेदवार नक्कीच निवडून येईल, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं.
“इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले
नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मुलगी म्हणून प्रचार करणार आहे. देवेंद्र फडणवीस जे काही सांगतील त्या पद्धतीने आणि त्या ताकदीने आम्ही मुंबई महापालिका लढणार आहोत. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असून शिवसेनेची सत्ता लवकरात लवकर जाणार असल्याचंही नवनीत राणा म्हणाल्या.
राष्ट्रपती निवडणुक ! शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅंनर्जींनी सुचवली ही नावं
देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर त्यांचा पुर्ण विश्वास आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीची परिस्थिती होती. त्याच्या दुप्पट परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे. भ्रष्टाचाराची लंका झाळण्यासाठी तेथील नागरीकच समोर येणार आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्कीच होईल, असा विश्वास देखील नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.
“आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार देखील निवडून आला. यामध्ये शिवसेनेचे नेते संजय पवार यांना पराभावाचा सामाना करावा लागला. मात्र आता येत्या 20 जूलै रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत असून 11 उमेदवार रिंगणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार सहज निवडून येतील मात्र दहाव्या जागेसाठी आता भाजप आणि काॅंग्रेसमध्ये लढत होणार आहे.
Read also:
- “मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
- “मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
- राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
- “ओबीसी, मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची हीच खरी वृत्ती”; पडळकारांचा सुप्रिया सुळेंवर टिकास्त्र
- “आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे