अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गरम झालं आहे. भाजपसह महायुतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. यातच अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासारखे महत्वाचे नेते महायुतीत सामील झाल्यानंतर महायुतीची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल. असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यावरून आता विद्यमान खासदार नवनीत राणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
२०१९ साली नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. यातच आता अमरावतीच्या जागेसाठी भाजप आग्रही असून शिंदे गटाने देखील या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ४ एप्रिल रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नागपुर दौऱ्यावर येणार आहेत. त्याच वेळी नड्डा यांच्या उपस्थिती नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
अमरावती लोकसभेतून भाजपचे काही इच्छूक उमेदवार निवडणूक लढण्यास तयार आहेत. यातच नवनीत राणा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ देखील महायुतीत असल्याने राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी देखील महायुतीकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी निवडणुक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यातून दोघांमध्ये चांगलेच खटके देखील उडाले आहेत.
यातच भाजपमधून इतरही काही नेते उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला ही जागा मिळण्याची शक्यता असून त्यांची ताकद आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राणांच्या पुढे मोठ्या अडचणी उभ्या ठोकल्या असून त्या आता शेवटचा पर्याय म्हणून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की