मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना इडीने काल ताब्यात घेतले. त्यामुळे आज महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते, खासदार याठिकाणी उपस्थित आहेत. मात्र शिवसेनेचे मंत्री त्याठिकाणी अजूनही उपस्थित झाले नाहीत.
कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यासह खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तर विरोधी पक्षांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा दिला नाही तर आंदोलन सुरू करू असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण एक वेगळ्याच मार्गाने जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्याहीवेळी पाठीमागे भक्कम उभा राहिला होता. यावेळी नवाब मलिक यांना पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. नवाब मलिक यांनी असं काहीही चुकीचं केले नाही. फक्त त्यांना बदनाम करण्याचं काम भाजपकडून केले जात आहे. एखाद्या मुस्लिम व्यक्तीचा संबंध नेहमी दाऊदशी जोडून त्यांच्या विरोधात राज्यात वातावरण तापवलं जातंय. बॉम्बस्फोटाचा संबंध अजिबात मलिकांसोबत कसलाही नाही, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्या राज्यभरात आंदोलन केले जाईल असं म्हटलं आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथं अशी परिस्थिती आहे. नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. यावर नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. तसेच नवाब मलिक यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील.
Read also:
- लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर, लढेंगे और जितेंगे भी; मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईत जोरदार बॅनरबाजी
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
- दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण
- गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
- 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा