नाशिक : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यावर राणा दाम्पत्याच्या भुमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी राणा दाम्पत्यांच्या भूमिकेवर टिका केली आहे. याचाच धागा पकडत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर तुमच्या घरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात जाण्याची गरज काय ? खाजवून खरूज कशासाठी काढत आहात ? कशाला कुणाला खिजवता? असं सांगतानाच तुमच्या या चिथावणीमुळे शिवसैनिक आक्रमक होत आहेत. तेही महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या महाप्रसादात बुक्कांबा, लाथाटकी आणि बुक्काकोट असतो. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत असून राणा दाम्पत्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असंही त्यांनी टिव्ही 9 बोलताना म्हटले आहे. तसेच खासदार संजय राऊतांनी देखील याबाबत ट्विट करत आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी, असं म्हणत राणा दाम्पत्यांवर संजय राऊत संतापले असल्याचं दिसत आहे.
“शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
दरम्यान, माझं आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट, ईडी आणि सीबीआय या सगळ्याच्या पलीकडे गेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं एक अजरामर वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे. सत्ता ही फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक सत्ता आहे आणि या सत्तेचे चटके आतापर्यंत अनेकांनी घेतले आहेत. तुम्हालाही घ्यायचा असेल तर घ्या, असंही संजय राऊत म्हणालेत.
Read also:
- सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
- तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
- मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
- गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
- “टिंगल केली तरी, पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही”; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्यावर पुनर्रच्चार