मुंबई : पेट्रोलच्या किमती शंभर पार असतानाच केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरलं आहे. या दरवाढीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. 10.26.26 ची किंमत 600 रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत 715 ने वाढली आहे. डिएफए जी अगोदर 1185 रुपये किंमत होती ती आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 च्या 50 किलोच्या पोत्याला 1175 ऐवजी 1775 रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत. या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
पेट्रोलच्या किमती शंभर पार असतानाच केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरलं आहे. पक्षातर्फे दरवाढीचा निषेध म्हणून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी जाहीर केले आहे.#FuelPriceHike #fertilizer pic.twitter.com/VtQngzFaK3
— NCP (@NCPspeaks) May 16, 2021
कोणत्याही परिस्थितीत ही दरवाढ कमी झाली पाहिजे. कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उठवतील अशी आम्हाला आशा आहे, असे ते म्हणाले.
पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे, अशी टीका जयंत पाटलांनी मोदी सरकारवर केली आहे.
Read Also :
- मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – प्रवीण दरेकर
- संजय गायकवाडांनी शब्द पाळला, थेट चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे केले वाटप
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने होणार सुरु? छगन भुजबळ घेणार आढावा बैठक
- ‘राज्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगल्या गोष्टी पचत नाहीत’
- माझ्या जिवाभावाचा मित्र एकटाच निघून गेला; आव्हाडांची फेसबुकवर भावनिक पोस्ट