पुणे : विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवारांनी मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. कर्जत येथील जाहीर मेळाव्यात शिरूरमध्ये आपला उमेदवार निवडून आणणारच असा प्रण घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात दाखल झाले. त्यानंतर पार्थ पवार, सुनेत्रा पवार तसेच इतर नेत्यांचे सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू झालेत. यातच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार ? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे देखील सुरूवातीला शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी नाव चर्चेत आलं होतं. परंतु अशीही आतली माहिती आहे की, दिलीप वळसे पाटलांनी लोकसभा निवडणुक न लढण्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवार गटाकडून माजी आमदार विलास लांडे यांचं नाव चर्चेत येत आहे. त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. त्याचसोबत भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील लोकसभा निवडणुक लढण्यासाठी तयार आहेत. तशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलीय. परंतु यातच आता 2019 च्या निवडणुकीपुर्वी भाजपात गेलेले राष्ट्रावादीचे नेते प्रदीप कंद यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रदीप कंद यांना आता अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा….जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४ मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेत्रा होती. मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातच आता त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उतरवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याला भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचीही हरकत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे विरूद्ध प्रदीप कंद अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले
शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले माजी खासदार व शिवेसना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांची अलिकडेच पुणे जिल्हा म्हाडा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिरूर लोकसभेबाबत जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला उमेदवारी दिली तरी माझी त्याला काही हरकत नाही. असं म्हणत आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभेवर आपला दावा सोडल्याचे दिसत आहेत. यातच आता हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघा एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड-आळंदी, भोसरी आणि हडपसर या मतदारसंघाचा समावेश आहे. यातील आमदार अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे असे चार आमदार सध्या अजित पवार गटात आहेत. तर यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे म्हणून आमदार आहेत. तर फक्त शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार सध्या शरद पवार गटात आहेत. त्यामुळे एकूण सहापैकी पाच आमदार सध्या महायुतीत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही मोठी फुट पडली. शिरूर लोकसभा मतदारसंघाती अनेकांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार गटात काही मोजकेच लोक राहिले आहेत. शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महायुतीत अजित पवार गटाकडून आता प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा आहे. यातच कागदावर अजित पवार गट मजबुत वाटत असला तरी शरद पवारांची जादू याठिकाणी अजित पवारांना अडथळा आणणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला