पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच नागपूर येथील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल मावळते पुणे आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा कारभार स्विकारला. यावेळी रितेश कुमार यांनी अमितेश कुमार यांचं जोरदार स्वागत केलं. तर रितेश कुमार यांना बढती देऊन होमगार्ड महासमादेशकपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे.
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
इतिहासात प्रथमच नागपुरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे नागपुर जिल्ह्याचे सर्वात जास्त काळ पोलिस आयुक्त असणारे आयुक्त आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देखील अमितेश कुमार यांच्याकडे बघितलं जात आहे. यातच निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात आपला मर्जीतील व्यक्ती असायला हवा. जणेकरून पालकमंत्री अजित पवार यांच्यावर वर्चस्व निर्माण करता येईल. या उद्देशाने फडणवीसांनी अमितेश कुमार यांच्याकडे पुण्याचा कारभार दिल्याची चर्चा राजकीय सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, अमितेश कुमार हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेतील १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहे. रितेश कुमार यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुण्याच्या पोलिस आयुक्त पदाचा कारभार स्विकारला होता. शहरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोका, एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला. शहरातील ११५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली.
READ ALSO :
हेही वाचा…तुमची किळस येते शेलार, तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्चाताप होत असेल राष्ट्रवादीची जहरी टिका
हेही वाचा…“संजय गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे”, रूपाली पाटील आक्रमक
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला