सिंधुदुर्ग : भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जाताहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय कुरघोडीतून नैराश्य आल्यामुळे निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
प्रत्येकाने राजकारणात कधी यायचं आणि कधी जायचं हा निर्णय त्यांनी घेतला आहे. दोन वेळा झालेल्या पराभवानंतर आगामी लोकसभा निवडणुक लढायची नाही, असंही माहिती कानावर आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून मागे गेले आहे. असंही म्हणता येणार नाही. मंत्री उदय सामंत यांचे विधान कधीही गांभीर्याने घेत नाहीत. किरण सामंत हे लोकसभेच्या रिंगणात उतरतील असे वाटत नाही. परंतु काही टोळक्यांना किरण सामंत लोकसभेला उभे राहिले पाहिजे. असं वाटतं आहे. परंतु किरण सामंत यांच्या माध्यमातून स्वत: ची तुंबडी कशी भरता येईल. अशी गोड आशा ठेऊन काही डोळके वावरत आहे. अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये निलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची भूमिका नारायण राणे जांनी जाणून घेतली आहे. नारायण राणे यांनी निलेश राणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती
हेही वाचा…दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती
हेही वाचा…“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…यामुळेच माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणातून घेतला सन्यांस, तर्कवितर्कांना उधाणं
हेही वाचा…“तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते,”पंकजा मुंडेंनी विधानसभा मतदारसंघ निवडला, ? सभेतूनच दिलं संकेत