पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला लाल महाल येथून सुरूवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांचं जंगी स्वागत केलं. यातच टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर शिंदे काय बोलणार ?
युवा संघर्ष यात्रा ही एकंदरीत ४५ दिवस चालणार आहे, ही दिंडी नव्या पिढीची आहे, ही दिंडी नव्या पिढीला आत्मविश्वास देणारी आहे आणि ही दिंडी आजूबाजूच्या गावातल्या बंधू-भगिनींना आणि तरुणांना एक प्रकारची प्रोत्साहन देणारी आहे. माझी खात्री आहे की, जे परिवर्तन करायचे जे निर्णय घेतले पाहिजे जो तुमचा आग्रह आहे , त्याची प्रक्रिया या संघर्ष युवा मोर्चा मधून होईल. असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आशीर्वाद सभेतून व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. त्याआधी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते.
हेही वाचा…“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”
दरम्यान, युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाल्यानंतर सरकारने कंत्राटी कामगारांचा निर्णय मागे घेतला, अजून तर सुरुवात व्हायची आहे पण, तेवढ्यात हा निकाल झाला आणि तुम्ही ज्या वेळेस सुरुवात कराल, नागपूरला पोहोचाल तेव्हा माझी खात्री आहे की, सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने ही यात्रा काढणाऱ्या तरुणांवर त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर दुर्लक्ष करण्याची भूमिका कोणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल आणि म्हणून ही दिंडी ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे. अंसही शरद पवारांनी म्हटलंय.
आमदार श्री. रोहित पवार यांनी सुरुवात केलेल्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना विश्वास आणि बळ देणाऱ्या ‘युवा संघर्ष यात्रा’ याला आजपासून पुण्यातून सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्व तरुण युवकांना मार्गदर्शन केले.
सन्माननीय व्यासपीठ लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व उपस्थित मान्यवर… pic.twitter.com/unFC0JGEvQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…यामुळेच माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणातून घेतला सन्यांस, तर्कवितर्कांना उधाणं
हेही वाचा…“तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते,”पंकजा मुंडेंनी विधानसभा मतदारसंघ निवडला, ? सभेतूनच दिलं संकेत
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल