मुंबई : सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकत खळबळ माजवून दिली होती. अशीच खळबळ आता आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उडवून दिली आहे आणि अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली आहे.
ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
एक खळबळ त्यांनी दिशा सालियन मृत्यप्रकारणात उडवून दिली आहे. तर दुसरीकडे त्यांना जेव्हा शिवसैनिक मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांच्यासोबत जे काही घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणली आहे. कोल्हापूरच्या रुग्णालयात त्यांना जेव्हा अँजिओग्राफी करण्यासाठी नेण्यात आलं होतं तेव्हा त्यांना तसं काही करण्याची गरज वाटत नसल्याचं सांगितलं. नंतर एक कर्मचाऱ्याने मला फोनवर सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अँजिओग्राफीसाठी तयार होऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे.
” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
माझी तब्येत बिघडलेली असताना हॉस्पिटलच्या बाहेर रात्री अडीच वाजता दोनशे पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता खळबळजनक आरोप आमदार नितेश राणे यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारवर केला आहे. कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना जे काही धक्कादायक घडत होतं याबाबत एक कर्मचारी मला वारंवार माहिती देत होता.
“कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
‘राणेसाहेब अँजिओग्राफी करू नका, तुमच्या जीवाला धोका आहे. त्यांना तुम्हाला संपवून टाकायचं आहे. तुमच्या शरीरात अँजिओग्राफीच्या नावाखाली एक इंक टाकून तुमचा काटा काढायचा आहे, त्यामुळे तुम्ही अँजिओग्राफीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होकार देऊ नका असं वारंवार मला सांगण्यात येत होतं. नीतेश राणे यांना कुठल्याही परिस्थिती डिस्चार्ज करा, आम्हाला त्यांना अटक करायची आहे, असा दबाव पोलिसांवर होता, अशी धक्कादायक माहिती नितेश राणे यांनी सभागृहाला दिली आहे.
Read also:
- कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
- “महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ते पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात
- “मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन