पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरूणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या घटनेवर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. या प्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष्य घालून तरूणींना न्याय मिळावं अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
कथित रघुनाथ कुचिक प्रकणावरून रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, नाक्रो टेस्ट करायला कोर्टोची ऑर्डर लागते असे कोणीही मागणी करून नार्को टेस्ट होत नाही. कोणीही ऐरे गैरे यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही. त्यांनी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी करत पुण्याचे पोलीस आयुक्तांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना कारवाई होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
या प्रकरणात पीडित तरुणीने म्हटलं आहे की, मी सर्वात पहिल्यांदा आमदार नीलम गोऱ्हे यांना फोन लावला होता मात्र त्यांनी याबाबत गांभीर्य दाखवले नाही. त्यांनी माझे फोनही उचलले नाही. त्यानंतर मी संजय राऊत यांना याबाबत सांगितले होते. सुरुवातीला त्यांनीही फोन उचलले नाही आणि नंतर नीलम गोऱ्हे यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही की संजय राऊतांनीही परत कधीही फोन केला नाही, असा दावा तरुणीने केला आहे.
योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
पीडित तरुणी आमच्याकडे येऊन बोलत नाही किंवा आमच्याशी संपर्क करत नाही, असं अनेक वेळा महाविकास आघाडी मधील नेत्याकडून बोलले जात आहे. पण ती तरुणी आमच्याकडे येऊन व्यक्त झाली आहे. आमच्यात विश्वासार्हता असल्याने ती आमच्याजवळ आली आहे. त्यामुळे आम्ही पीडित तरुणीला निश्चित न्याय मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read also:
- “महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ते पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात
- “मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला