मुंबई : तुम्ही कितीही हल्ले करा, आमचा शिवसेनेचा किल्ला मजबूत आहे. कारण मतदार बघतोय दर आठवड्याला भाजप मुखवटे बदलतात. एक आठवडा आशिष शेलार, एक आठवडा अतुल भातखळकर, एक आठवडा अमित साटम. म्हणून मुख्यमंत्री बरोबर बोलतात की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
भाजप नेत्यांकडून सातत्याने शिवसेनेवर टीका करण्यात येते आहे. याबाबात पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत भाजपच्या प्रत्येकाने एक अजेंडा घेतला आहे. इकबाल चहल त्यांच्या हिटलिस्टवर का असतात? कोरोना काळात चहल यांनी चांगलं काम केलं हे भाजप ला पाहवत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्या म्हणाल्या की गेल्या पंचवीस वर्षातील 20 वर्ष भाजप आमच्या सोबतच होती मांडीवर बसले होते तेव्हा भाजप का बोलले नाही भाजपचा स्तर इतका खाली गेला आहे. २५ वर्षांत एकही वर्ष भाजपचा स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा नाही. महापौर आमचा होता. आमचा काही यात हात नाही, कारण सर्व अधिकार त्यांनी स्वत:कडे ठेवले होते. अविश्वास ठराव हा सगळ्यांचा सहमतीने घ्यावा लागतो. स्थायी समितीमध्ये चर्चा होत होती तेव्हा का बोलले नाही. भाजप आरोप करत असते त्यांनी सिद्ध करावे असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
पुढे त्या म्हणाल्या, प्राण्यांच्या स्मशानभुमीबद्दल पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत मुक्या प्राण्यांची स्मशानभूमी नाही. मुक्या पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. नगरसेविका घोसाळकर यांच्या प्रभागात शवदाहिनी उभारणार असून सात झोन मध्ये मुंबईत मुक्या प्राण्यांची स्मशानभूमी उभारणार असल्याचं त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते अमित साटम?
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अमित साटम यांनी म्हटलं, मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. यशवंत जाधव सारख्या सहकाऱ्यांवर त्यांना अभिमान असेलच. आयकर विभागाच्या तपासात 15 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा पुरावा, त्यात जबाब नोंदवला गेला आहे. प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावावर करुन अनसिक्युअर्ड लोन दाखवून कशा प्रकारे 15 कोटींची गोलमाल केली आहे. स्थायी समितीच्या टक्केवारीतून मिळवलेला पैसा कशाप्रकारे त्या ठिकाणी फिरवला आहे. अशा सहकाऱ्यांवर अभिमान तर असेलच.
Read also:
- आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे; इच्छुकांना अजित पवारांना मोठा धक्का
- राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
- …तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
- पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय