सोलापूर : काल निवडणुक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून नाव देण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव पडला. बाळासाहेबांची शिवसेना नेमकी कुणाची? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब आंबेडकर की जाऊ द्या ना बाळासाहेब अशा पद्धतीचे मीम्स तयार झालेत. त्यानंतर आता बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
काल निवडणुक आयोगाने पक्षाचं नाव घोषित केल्यानंतर अनेक टिकाकारांनी यावरून टिका केली. मात्र महाराष्ट्र मराठी माणसांची बुलंद तोफ असणारे फक्त एकच बाळासाहेब आहे ते म्हणजे हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कुणीही त्याची चेष्टा करू नका. असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुक आयोगाने कोणतंही चिन्ह आम्हाला दिलं तरी त्याचं आम्ही स्वागत करू असं देखील ते म्हणाले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
अफजल खानांच्या विचारांची सेना आहे. अशी टिका सामानातून करण्यात आली आहे. त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. सुरूवातीला मी सामाना पेपर वाचत होतो. परंतु ज्या दिवसापासून संजय राऊत सामानाचे संपादक झाले तशापासून मी सामाना वाचत नाही. त्यामुळे जी काही सामानातून आमच्यावर टिका करण्यात येत आहे. त्याला जनताच उत्तर देणार आहे. तसेच टिका टिप्पणी करून लोक त्यांना मतदान करीत नाहीत तर लोक काम पाहून मतदान करतात असा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
“शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
दरम्यान, मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्याचे भ्रष्ट, बेईमान गेंड्यांची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे..छे यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्यांच्या विचांराची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे. येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे.. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील. हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार? असा खोचक सवाल देखील सामानातून करण्यात आला आहे.
Read also
- “कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”
- “आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
- “पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे
- शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
- “नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं