मुंबई : काल शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातून पाठवलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखेच असल्या कारणाने दोन्ही चिन्ह रद्द ठरविले होते. त्यामुळे आज पुन्हा शिंदे गटाकडून निवडणुक आयोगाला सकाळी दहा वाजेपर्यंत निवडणुक चिन्ह पाठवणे गरजेचे होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आता निवडणुक आयोगाकडे तीन चिन्हे पाठवली आहेत.
“हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे प्रभु श्रीरामाने ‘धनुष्यबाण’ हिसकावलं”
शिंदे गटाकडून सुरूवातीला शंख, तुतारी, आणि रिक्षा ही तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणुक आयोगाकडे ठेवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिंदे गटाकडून दुसरा मेल देखील पाठवण्यात आला आहे. त्या दुसऱ्या मेलमध्ये शिंदे गटाकडून ढाल-तलवार, सुर्य आणि पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार
शिंदे गटाकडून पाठवलेल्या चिन्हांबाबत निवडणुक आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आयोगाने शिंदे गटाला नाव दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. काल निवडणुक आयोगाने निर्णय दिल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मशाल पेटवून शिवसैनिकांनी नव्या चिन्हाचं स्वागत केलं आहे.
“उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
दरम्यान, आगामी काही महिन्यात अंधेरी पुर्व पोटनिवडणुक होऊ घातली आहे. यातच उद्धव ठाकरे यांना नवं चिन्ह आणि नवं नाव घरोघरो पोहचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्याची तयारी देखील आता उद्धव ठाकरेंनी केली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने माघार घेतल्याने आता भाजप विरूद्ध उद्धव ठाकरे अशी रंगत रंगणार आहे.
Read also
- “नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
- “धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
- “शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
- “उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”