मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून शिंदे आणि ठाकरे अशी राजकीय लढाई सुरू आहे. यातच आता निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला वेगवेगळी नावं दिली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळालं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी एल्गार पुकारला आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
“उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
काल निवडणुक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह जाहीर केल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. लगचे काल शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावरील डीपी देखील बदलला. मशाल निवडणुक चिन्ह मिळाल्यानंतर अनेकांनी ठिकठिकाणी मशाली देखील पेटवल्या. पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
“हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे प्रभु श्रीरामाने ‘धनुष्यबाण’ हिसकावलं”
शिंदे गटाकडून पाठवलेल्या चिन्हांबाबत निवडणुक आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आयोगाने शिंदे गटाला नाव दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. काल निवडणुक आयोगाने निर्णय दिल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मशाल पेटवून शिवसैनिकांनी नव्या चिन्हाचं स्वागत केलं आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, आगामी काही महिन्यात अंधेरी पुर्व पोटनिवडणुक होऊ घातली आहे. यातच उद्धव ठाकरे यांना नवं चिन्ह आणि नवं नाव घरोघरो पोहचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्याची तयारी देखील आता उद्धव ठाकरेंनी केली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने माघार घेतल्याने आता भाजप विरूद्ध उद्धव ठाकरे अशी रंगत रंगणार आहे.
Read also
- शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
- “नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
- “धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
- “शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला