मुंबई : मागील कित्येक दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना, महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्रात सातत्याने हा संघर्ष बघत आलेला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी परवा नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून आठ तासांसाठी चौकशी करण्यात आली.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
यापूर्वी नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘अधिश’ बंगल्याच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस धाडण्यात आली होती. महानगरपालिकेच्या एका पथकाकडून या बंगल्याची नुकतीच चौकशी करण्यात आली होती. यानंतर राजकीय वातावरण बरंच पेटलं होतं. यानंतर बऱ्याच गोष्टी घडून आल्या. नारायण राणेंनी थेट ठाकरे कुटुंबियांवर शाब्दिक हल्ला चढवला आणि दुसरीकडून देखील कमालीचे शाब्दिक हल्ले झाले. आता पुन्हा एकदा नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश बंगल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
नारायण राणेंच्या अधिश बंगल्याला आता मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस धाडण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाकडून पाहणी झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर ही नोटीस धाडण्यात आली आहे. बांधकामाबाबत ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
नारायण राणेंनी बांधलेला ‘अधिश’ बंगला हा बांधण्यावेळी काहीसा अतिरीक्त जागेत बांधण्यात आलेला आहे. अतिरिक्त बांधकाम जे झालेलं आहे त्याबाबत मागील आठवड्यात पालिकेच्या पथकाने पाहणी केली होती. याबाबत पालिकेकडून आक्षेप नोंदण्यात आला असून नोटीस पाठवण्यात आली आहे. नारायण राणेंना आता या नोटिशीला लवकरात लवकर उत्तर द्यावे लागणार आहे. जर राणेंनी याला उत्तर दिलं नाही तर पालिकेकडून अधिश बंगल्यावर हातोडा मारण्यात येऊ शकतो.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार