सांगली – मागील काही आठवड्यांमध्ये सांगली जिल्ह्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक होणार होती. यामध्ये घोडेबाजारिला ऊत आला होता असं म्हणायला हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी पॅनल टाकण्यात आला होता.
मतदार ठराव पळवा-पळवीवरून आटपाडीत चांगलाच राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पडळकरांमध्ये चांगलाच राडा झाला. हरमरीतुमरीचे रूपांतर कडाक्याच्या हाणामारीत झाले. दगडफेक झाली. दोन्ही बाजुंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी पडळकरांनी अंगावर गाडी घातली असा आरोप एका राष्ट्रवादीच्या नेत्याने केला होता.
माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मला राजकारणातून संपवायचे आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप पडळकरांनी केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच पेटले आणि आटपाडीत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. एलसीबीचे पथक देखील तेथेच ठाण मांडून आहे.
पडळकर यांना लक्ष्य करत आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी करून खळबळ उडवून दिली होती.त्यानंतर पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना अटक करण्यात आली नव्हती. पडळकर हे सध्या राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सक्रियपुणे पुढे आहेत. उच्च न्यायालायने जामीन फेटाळल्यानंतर पोलिस त्यांना आंदोलन स्थळापासूनच अटक करतील का, याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनीही योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी पथके करून धरपडक मोहीम करण्यात आली. ‘एलसीबी’चे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह सहायक निरीक्षक निरज उबाळे, प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, विशाल येळेकर, दिलीप ढेरे, महादेव नागणे, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव यांच्या पथकाचा समावेश आहे.
Read Also :
- ‘शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक झाली तर वावगं काय?’ आव्हाडांचा रोखठोक सवाल
- सातारा जिल्हा बँकेत दोन दिग्गज नेत्यांचा निसटता पराभव; आमदार शशिकांत शिंदे, राज्य गृहमंत्री देसाई थेट पराभूत
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
- परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा
- एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास